new

दि ०१/०७/२०१५ रोजी महाराष्ट्रातील सर्व वीज कंत्राटी कामगारांनी आप आपल्या परिमंडळ कार्यालया बाहेर धरणे आंदोलन करायचे आहे. अधिक माहिती साठी संपर्क -श्री. निलेश देवराव खरात, उपाध्यक्ष महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संपर्क क्र.9970005165

Saturday, June 13, 2015

मुख्य पान

भारतीय मजदूर संघ


भारतीय मजदूर संघ ही भारतातील सर्वात मोठी आणि भारतातील प्रथम क्रमांकाची कामगार संघटना आहे.
pi-1

भारतीय मजदूर संघाची स्थापना महान विचारवंत श्रद्धेय. दत्तोपंत ठेंगडी यांनी  स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जन्मदिवशी म्हणजे २३ जुलै १९५५ रोजी केली. भारतातील इतर संघटना ज्याप्रमाणे विभाजन होऊन निर्माण झाल्यात तशी ही संघटना निर्माण झाली नसून भारतीय मजदूर संघ ही सम विचारधारा असणार्‍या लोकांच्या एकत्रीकरणाचा प्रयत्न म्हणून झाली. कामगारांचे, मजूरांचे व मालकांसाठी श्रमदान करणार्यांची संघटना आहे.




        भारतीय मजदूर संघाची घोषवाक्ये
देशभक्त मजदूरो एक हो एक हो!।
राष्ट्रभक्त मजदूरो एक हो एक हो!।
मजदूरो दुनिया को एक करो!।
देश के हित में करेंगे काम, काम के लेंगे पूरे दाम्!
भारतीय मजदूर संघाच्या प्रत्येक कार्यक्रमाची सुरूवात खालील गीताने केली जाते.


मानवता के लिए उषा की किरण जगाने वाले हम,
शोषित, पीडित, दलित जनों का भाग्य बनाने वाले हम।

हम अपने श्रम सीकर से ऊसर में स्वर्ण उगा देंगे,

कंकड पत्थर समतल कर कांटों में फूल खिला देंगे।

सतत परिश्रम से अपने हैं वैभव लाने वाले हम,

शोषित, पीडित, दलित जनों का भाग्य बनाने वाले हम।
अन्य किसी के मुंह की रोटी हरना अपना काम नहीं,
पर अपने अधिकार गंवा कर, कर सकते आराम नहीं।
अपने हित औरों के हित का मेल मिलाने वाले हम,
शोषित, पीडित, दलित जनों का भाग्य बनाने वाले हम।
रोटी, कपडा, मकान, शिक्षा आवश्यकता जीवन की,

व्यक्ति और परिवार सुखी हो तभी मुक्ति होती सच्ची।

हँसते – हँसते राष्ट्र कार्य में शक्ति लगाने वाले हम,
शोषित, पीडित, दलित जनों का भाग्य बनाने वाले हम।
भारत माता का सुख गौरव प्राणों से भी प्यारा है,

युग – युग से मानव हित करना शाश्वत धर्म हमारा है।

जीवन शक्ति उसी माता को भेंट चढाने वाले हम,

शोषित, पीडित, दलित जनों का भाग्य बनाने वाले हम।





महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाबद्दल थोडक्यात
IMG-20150105-WA0050(1)
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ ही भारतीय मजदूर संघाची संलग्न संघटना आहे. कंत्राटी कामगारांच्या हक्कासाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने सतत लढा दिला आहे. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ ही कंत्राटी कामगारांची महाराष्ट्रातील एकमेव आणि सर्वात पहिली नोंदणीकृत संघटना आहे. वीज क्षेत्रामध्ये कंत्राटी कामगारांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालले होते. ही सर्व बाब लक्षात घेऊन भारतीय मजदूर संघ आणि वीज क्षेत्रामधील कायम कामगारांची संघटना महाराष्ट्र वीज कामगार महासंघ यानी विचारविनिमय करून कंत्राटी कामगाराना न्याय मिळवून देण्यासाठी आपणच पुढे येऊन काहीतरी केले पाहिजे या भावनेने १४ डिसेंबर २००८  मध्ये महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ या संघटनेची स्थापणा केली. तसेच संघटनेची अधिकृत नोंदणी ६ फेब्रुवारी २००९ रोजी झाली. तिन्ही वीज कंपन्यांमध्ये एकूण २७ संघटना असून त्यापैकी सर्वात प्रथम  महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ आणि  कायम कामगारांची महाराष्ट्र वीज कामगार महासंघाने कंत्राटी कामगारांचा प्रश्न  आजपर्यंत पोटतिडिकीने प्रशासनापुढे वेळोवेळी मांडला आहे.
त्यामुळे आज पर्यंत कंत्राटी कामगाराना किमान वेतन दरमहिन्याला पगार, ए.स.आइ. यासारखे प्रश्न संघटनेने सोडविलेले आहेत. तसेच आज हजारो वीज कंत्राटी कामगारांना वीज उद्योगात प्रतिष्ठा, श्रमाचे वाजवी मुल्य मिळवून देण्यात संघटना यशस्वी झाली आहे.
तसेच वीज क्षेत्रात कंत्राटी कामगाराना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना बांधील असून आगामी काळात कंत्राटी कामगाराना सामावून घेण्यासाठी संघटना प्रयत्न करीत राहील. आणि यात यश मिळवेल ही खात्री सर्व कामगाराना असेल यात कोणाचे दुमत नसावे.

3 comments:

  1. How to Play Online Pai Gow Poker for Real Money | WMRione
    Learn how to play Pai Gow Poker, how 바카라 검증 사이트 to play online, and where to play real money on Pai Gow poker.

    ReplyDelete
  2. MrC - Casino - Drmcd
    MrC. is a social casino and casino games and 부산광역 출장샵 betting website. We offer 하남 출장마사지 a wide range 영주 출장마사지 of casino games such 사이트 추천 as poker, blackjack and 평택 출장샵 roulette.

    ReplyDelete